एक फायदेशीर आयुर्वेदिक उपचार म्हणजेच पायाची मालिश आहे, ज्यामध्ये पायाची तेलांनी आणि औषधी तूपानी विशेष तंत्रज्ञानाद्वारे मालिश केली जाते. स्वायत्त तंत्रिका तंत्राच्या विविध प्रकारच्या गोंधळांवर उपचारात शांतता आणि संतुलन यावर प्रभाव होतो.
- पादाभ्यंग म्हणजे पायाला औषधी तेल, तुप याने मॉलिश करणे.
- शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी, डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
- मानसिक ताण कमी होऊन शांत झोप लागण्यासाठी अत्यंत लाभदायी असा उपाय आहे.
- संगणक, टी.व्ही., मोबाईल इत्यादीमुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी, मधुमेहामुळे पायातील संवेदना कमी होऊ नये यासाठी उपयोगी आहे.
- पादाभ्यंगात घृत (तुप) लावून कास्याच्या वाटीने अभ्यंग केल्याने फायदे अनेकपटीने वाढतात.