उत्तरबस्ती: त्रीरोगांवरील पंचकर्म.
- उत्तरबस्ती याचा अर्थ गर्भाशयामध्ये औषध सोडणे होय.
- यामुळे गर्भाशयाचे आतील आवरण प्राकृत राहून स्त्री बीजाची वाढ व्यवस्थित होते व यामुळे गर्भाशयात गर्भधारणा राहण्यासाठी पोषक अशा वातावरणाची निर्मिती होते.
- उत्तरबस्ती साठी रुग्णेला कुठलाही त्रास होत नाही किंवा कुठलीही भूल देण्याची गरज पडत नाही.
- उत्तरबस्तीमुळे सुदृढ व सक्षम अपत्य प्राप्ती होते.
उत्तरबस्ती कोणी घ्यावी :
- निरोगी स्त्रीने गर्भधारणेच्या आधी बीज शुद्धीसाठी – गर्भसंस्काराची सुरुवात म्हणून.
- पाळी अनियमित असणे.
- पाळीच्या वेळी ओटीपोटात वेदना होणे.
- पाळीमध्ये रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होणे.
- पाळी अजिबात न येणे.
- अंगावरून पांढरे जाणे.
- रक्तस्त्राव गाठींनी युक्त, चिकट वा दुर्गंधीयुक्त असणे.
- PCOD, अंगावरुन गाठी जाणे.
- स्त्री बीजाची वाढ न होणे (एनोव्हुलेट रीसायकल).
- गर्भाशयाची नलिका बंद असणे (फेलोपियन ट्यूबल ब्लॉक).
- गर्भाशयात गाठी असणे.
- गर्भधारणा न होणे.
- वारंवार गर्भपात होणे.
- गर्भाशय, योनी या अवयवांमध्ये शिथिलता येणे.
- पाळी येण्याआधी स्तनात जडपणा, वेदना तसेच कंबरदुखी, पाठदुखी वगैरे त्रास जाणवणे.
आयुर्वेदाविषयी गैरसमज :
सामान्य जनमाणसात आयुर्वेदाविषयी अनेक गैरसमज आढळतात. वंध्यत्वाविषयी आयुर्वेदासाठीचा दृष्टीकोन अजुनही सुधारलेला नाही. वंध्यत्वासाठी आयुर्वेद शास्त्रात यशस्वी व अधिक प्रभावी उपचार पद्धती आहेत. यावर अनेक लोकांचा विश्वासच बसत नाही. माझ्या दैनंदिन वैद्यकीय व्यवसायात वंध्यत्वाचे यशस्वी रुग्ण इतरांनादेखील ठामपणे आयुर्वेदीक चिकित्साच घेण्याचा सल्ला देतात. हे बघुन मला तुम्ही चमत्कार दाखवा, लोक तुम्हाला नमस्कार घालतील या उक्तीचा प्रत्यय आला.आजच्या धकाधकीच्या जीवनात आहारातील अनियमितपणा, जेवण वेळेवर नसणे, फास्टफुड, चायनीज, बेकरी फुड, मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव यामुळे शरिरातील रस व रक्तधातु यांचे व्यवस्थित पोषण होत नाही. त्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होते. यामुळे पाळीच्या काळात अंगावरुन कमी जाणे, ओटीपोटात दुखणे, अंगावरुन गाठी जाणे इ. तक्रारी निर्माण होतात. तसेच पाळीच्या काळात आयुर्वेदीक दिनक्रमाप्रमाणे स्त्रीने आराम करणे जास्त महत्वाचे असते. परंतू आजच्या करीअर प्राधान्य लाईफमध्ये नोकरीमुळे मानसिक व शारिरीक ताण-तणाव असल्यामुळे स्त्री शरिरातील हार्मोन्सची पातळी बदलते. यामुळे स्त्रीबीजाची वाढ खुटते. याचाच परिणाम गर्भधारणा न राहणे हा होतो.
पंचकर्म चिकित्सा :
या सर्व तक्रारीवर आयुर्वेदात श्रेष्ठ अशी चिकित्सा – उत्तरबस्ति याचा उल्लेख सर्वच आयुर्वेदीक ग्रंथामध्ये आहे. उत्तरबस्ती याचा अर्थ गर्भाशयामध्ये औषध सोडणे हा होय. यामुळे गर्भाशयाच्या आतील आवरण प्राकृत राहून स्त्रीबीजाची वाढ व्यवस्थित होते व यामुळे गर्भाशयात गर्भधारणा राहण्यासाठी पोषक अशा वातावरणाची निर्मिती होते. उत्तरबस्तिसाठी रुग्णाला कुठलाही त्रास होत नाही किंवा कुठलीही भुल देण्याची गरज पडत नाही. उत्तरबस्तिमुळे सुदृढ व सक्षम अपत्यप्राप्ती होते. याचा फायदा इच्छुक व गरजु रुग्णांनी कुठल्याही आयुर्वेदीक पंचकर्म तज्ञांकडून करून घ्यावा ही सदिच्छा.
उत्तरबस्ती कधी घ्यावी :
पाळीच्या 6, 7, 8 व्या दिवशी दवाखान्यात येणे. या काळामध्ये गर्भाशयाचे तोंड उघडे असते. त्यामुळे उत्तरबस्ती हे पंचकर्म करता येते.